Advertisement

टिटवाळा-सीएसटी सकाळची 8.33 ची एसी लोकल रद्द करण्याची प्रवाशांची मागणी

टिटवाळा-सीएसटी सामान्य लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

टिटवाळा-सीएसटी सकाळची 8.33 ची एसी लोकल रद्द करण्याची प्रवाशांची मागणी
SHARES

टिटवाळा-सीएसटी सामान्य लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. टिटवाळा स्थानकातून 8.33 वाजता सामान्य लोकल सुरू होती. पण त्याजागी आता एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. एसी ट्रेनऐवजी सामान्य लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असून त्यात शेकडो लोक सहभागी झाले होते.

प्रवाशांनी दावा केला की, एसी लोकल रिकामी जाते कारण बहुतेकांना भाडे परवडत नाही आणि नियमित प्रवाशांना पुढील लोकलसाठी जवळपास अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते. असोसिएशनने सुरू केलेल्या मोहिमेत सुमारे 400 प्रवाशांनी स्वाक्षऱ्या केल्या.

“सकाळी 8.33 ची सामान्य लोकल ट्रेन आता एसी ट्रेनमध्ये बदलली आहे, आम्हाला पुढच्या लोकलची वाट पहावी लागते, जी सकाळी 8.53 वाजता आहे, तोपर्यंत संपूर्ण स्टेशन खचाखच भरलेले असते आणि फारच कमी लोक त्यात चढू शकतात. बाकीच्यांना जास्त वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. क्वचितच कोणी एसी ट्रेनने प्रवास करते.” संतोष शेळके यांनी हिंदुस्तान टाईम्सला ही माहिती दिली. संतोष दररोज कामासाठी ठाण्याला पोहोचण्यासाठी सकाळी 8.33 च्या लोकल ट्रेनमध्ये चढायचे.

ट्रेन बदलल्यामुळे स्थानकावर जास्त गर्दी झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली, ज्यामुळे स्थानकावर बाचाबाचीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

“बरेच जण सकाळी ८.३३ ची लोकल ट्रेन पकडायचे. कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे सोयीचे होते. पण एसी लोकलमुळे कामाच्या ठिकाणीही उशिरा पोहोचत आहेत कारण त्यांना खूप गर्दी असलेल्या पुढच्या ट्रेनमध्ये चढता येत नाही,”असं संगीता मिश्रा यांनी म्हटलं.

“एकतर रेल्वेने अधिक सामान्य लोकल सुरू कराव्यात किंवा सकाळी 8.33 ची एसी लोकल रद्द करावी आणि या विशिष्ट वेळेसाठी सामान्य ट्रेनची सेवा प्रदान करावी.” कल्याण कर्जत कसारा पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय देशेकर म्हणाले.

असोसिएशनचे सरचिटणीस श्याम उबाळे म्हणाले की, एसी लोकल सुरू करताना सध्याच्या सामान्य लोकल सेवेत अडथळा आणू नये यासाठी त्यांनी रेल्वेला कळवले आहे.

मध्य रेल्वेचे प्रमुख पीआरओ, शिवाजी सुतार म्हणाले, “अलीकडेच आम्ही टिटवाळा विभागासह मुख्य मार्गावर ३६ नवीन लोकल (३४ एसी आणि २ नॉन-एसी) जोडल्या आहेत. मागणी लक्षात घेऊन मंत्रालयाने अलीकडेच AC लोकलच्या भाड्यात 50% आणि नॉन-AC प्रथम श्रेणीचे भाडे जवळपास 40% ने कमी करण्याची घोषणा केली आहे.

“आम्ही एसी लोकल सुरू करण्याबाबत विभागातील लोकांशी आणि प्रवासी संघटनांशी बोललो आहोत. भाड्यात कपात केल्यानंतर आणि उष्णता आणि आर्द्रतेमुळेही एसी लोकलला मोठी मागणी आहे. मेनलाइनवरील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, विशेषतः पीक अवर्समध्ये, आम्ही हार्बर लाईनवरून एसी रेक मागे घेतला आहे (जेथे आम्हाला मेनलाइनच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळत होता) आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी मेनलाइनवर 12 एसी सेवा सुरू केल्या आहेत.



हेही वाचा

बेस्टच्या कंत्राटी चालकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन, प्रवाशांचे हाल

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गांवर एसी लोकलच्या 12 फेऱ्या वाढवल्या, पाहा टाईमटेबल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा