Advertisement

एसटी महामंडळाच्या कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या अरोग्याकडे दुर्लक्ष


एसटी महामंडळाच्या कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांच्या अरोग्याकडे दुर्लक्ष
SHARES

कोरोनामुळं राज्यभरात लॉकडाऊन करण्यात लागू करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाचे कर्मचारी आपलं कर्तव्य चोख बजावत होते. अनेक कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून वाहतूक सेवा दिली. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी महामंडळाचे सद्यस्थितीत ११४ कर्मचारी कोरोनाबाधित असून आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु महामंडळाने आकडेवारी गोळा करण्यापलिकडे कोणतीही मदत केलेली नाही. आधीच वेतनकपात, त्यात उपचारांसाठी महामंडळाकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी एसटीत अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्तव्यावर असताना ज्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्याला नियमानुसार ५० लाख रुपयांचे अनुदानही देण्याचे स्पष्ट केले गेले. परंतु त्याबाबत अद्यापही हालचाली झालेल्या नाहीत.

मुंबईसह अन्य आगारात या ३ महिन्यांच्या कालावधीत एसटीतील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगाराची पाहणी, कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना मिळणाऱ्या सुविधांची विचारपूसही केलेली नाही. तसंच, कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावी जाण्याचा अजब सल्ला दिला जात आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांच्या औषधाचा खर्च उचलणे गरजेचे आहे. दरम्यान एसटीतील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना रुग्णालय उपलब्ध करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होत आहेत.हेही वाचा -

अतिरेक्यांची ताज हॉटेलला धमकी, कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Coronavirus Cases : मुंबईत कोरोनाचे १३११ नवे रुग्ण, दिवसभरात १५१ जणांचा बळीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा