Advertisement

एसटीच्या ३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतील सर्वाधिक कोरोना कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.

एसटीच्या ३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनानं टार्गेट केलं आहे. कोरोनामुळं एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच, तर ३१६ कर्मचारी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आतापर्यंत एसटीच्या ९७० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ६२२ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत.

एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतील सर्वाधिक कोरोना कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामुळं मृत झालेल्या ३२ कर्मचाऱ्यांपैकी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यानंतर ठाणे विभागातील विविध आगारातील कर्मचारी आहेत. कर्तव्यावर असताना कोरोनामुळं मृत झाल्यास अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. मात्र अद्याप केवळ ६ कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच ही मदत मिळाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनच्या काळात प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवणारी बंद ठेवण्यात आली होती. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यात येत होती. परंतु, हळुहळू एसटी महामंडळानं एसटीमधील प्रवासी संख्येत वाढ केली आहे. त्यामुळं प्रवाशांना प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळानं २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ५० टक्के  प्रवासी क्षमतेने धावणारी एसटी पूर्ण प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी महामंडळानं २ आसनांमध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळानं दिली. एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळं एसटीचं उत्पन्न कमी झालं आहे.



हेही वाचा -

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटीत २ आसनांमध्ये पडदे

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा