Advertisement

'या' रेल्वे स्थानकात रिझर्वेशन काउंटर्स सुरु

१ तारखेपासून रेल्वेमार्फत ज्या गाड्या चालवल्या जाणार आहेत, त्याच गाड्यांचं रिझर्वेशन या आरक्षण काउंटर्सवर मिळणार आहे.

'या' रेल्वे स्थानकात रिझर्वेशन काउंटर्स सुरु
SHARES

देशातील अंतर्गत विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. अशातच रेल्वेनं प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रेल्वेच्या स्थानकात शुक्रवारपासून मर्यादित स्वरूपात रिझर्वेशन काउंटर्स सुरु करण्यात आले आहेत. १ तारखेपासून रेल्वेमार्फत ज्या गाड्या चालवल्या जाणार आहेत, त्याच गाड्यांचं रिझर्वेशन या आरक्षण काउंटर्सवर मिळणार आहे.

हे काउंटर्स मर्यादित स्वरूपात सुरु राहणार आहेत. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २५ मार्चपासून रिझर्वेशन काउंटर्स बंद ठेवण्यात आले होते. रेल्वे बोर्डाकडून नोटिफिकेशन काढण्यात आलं. यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटरवरून देखील याबाबत माहिती दिली आहे.

रिझर्वेशन काउंटर्स :

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर - ४ काउंटर्स 
  • लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर - ३ काउंटर 
  • दादर स्टेशनवर - २ काउंटर 
  • ठाणे स्टेशनवर - २ काउंटर 
  • कल्याण स्टेशनवर - २ काउंटर
  • बदलापूर स्टेशनवर - २ काउंटर
  • पनवेल स्टेशनवर - ३ काउंटर 

१ जूनपासून सुरु होणाऱ्या २०० ट्रेन्स आणि चालवल्या जाणाऱ्या राजधानी गाड्यांची तिकिटं तुम्हाला मिळू शकणार आहेत. मुंबईतील उपनगरीय रेल्वे किंवा राज्यांतर्गत कोणतीही रेल्वे, शटल्स, एक्स्प्रेस सुरु झालेल्या नाहीत.



हेही वाचा -

पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी एका वर्षासाठी स्थगित

तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा