कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं मागील २ महिने रस्त्याच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. गाड्या एका ठिकाण उभं असल्यानं गाड्यांमध्ये बिघाड होतात. त्यामुळं दुचाकी व चारचाकी वाहनांची दुरुस्तीची कामं वाढली आहे. यामध्ये रिक्षा-टॅक्सींची संख्याही लक्षणीय आहे. कार्यालयं सुरू होणार असल्यानं मुंबईकरांनी या वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी गॅरेजच्या बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
२ महिन्यांहून अधिक काळ वाहनं बंद असल्यानं दुचाकींचं इंजिन, काबरेरेटर खराब झाली आहेत. त्याचबरोबर ब्रेक, क्लज यांची दुरुस्ती, बॅटरीतील बिघाड, उंदरानं वायरी कुरतडणं, पावसाळी संरक्षक कव्हर बसविणं आदी कामं घेऊन नागरिक गॅरेजच्या चकरा मारत आहेत. दुचाकींच्या सव्र्हिस सेंटरमध्येही मोठी गर्दी होत आहे. दुकानं उघडल्यावर पहिल्या ३-४ दिवसांत अनेकांनी सर्व्हिसिंगसाठी गाड्या आणल्याची माहिती मिळते.
पावसाळ्यापूर्वी पाण्यापासून गाडीच्या संरक्षणासाठी अनेक कामांकरीता अनेकांनी गर्दी केली आहे. दररोज दुरूस्ती अथवा कव्हर बसवण्याच्या कामासाठी वाहनं येत आहेत. मात्र, अनेक कर्मचारी घरी गेल्यानं अडथळे येत आहेत. त्याशिवाय, कमी दुकानं खुली करण्याची परवानगी महापालिकेनं दिली आहे.
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९७ रुग्ण दगावले आहेत. तर १० जून रोजी ९७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ९ जून रोजी रोजी एकूण ५८ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १५४० नवीन रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ५३ हजार ९८५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात करोनाचे ५१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण २४ हजार २१६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -
मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी
पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली सज्ज