Advertisement

प्रवाशांच्या सेवेसाठी मोनोरेल सज्ज, लवकरच येणार रुळावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ५ महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल्वे आता लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी मोनोरेल सज्ज, लवकरच येणार रुळावर
SHARES

मोनो रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ५ महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल्वे आता लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. १ सप्टेंबरपासून राज्यात अनलॉक ४ सुरू होत आहे. या अनलॉकमध्ये ७ सप्टेंबरपासून दिल्लीत मेट्रो सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिल्यास मुंबईत मेट्रो धावण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मोनोही रुळावर येण्यासाठी सज्ज आहे. मात्र, यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळं मोनोरेल्वेला राज्य सरकारची परवानगी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या मेट्रोसह मोनोच्या देखभाल दुरुस्तीचं काम वेगानं सुरू आहे. मोनो रेल्वेची देखभाल दुरुस्ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं मुंबापुरीतल्या बेस्ट, लोकल, मेट्रोप्रमाणे मोनोरेल्वेची सेवा देखील ठप्प झाली. मेट्रो आणि मोनो अशा दोन्ही रेल्वे परवानगी मिळताच धावण्यासाठी सज्ज आहेत.

अनलॉक ४ मध्ये राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर मोनो रेल्वेची सेवा प्रत्यक्ष सुरू करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तांत्रिक समस्यांना सामोरं जावं लागू नये म्हणून गेल्या कित्येक दिवसांपासून मोनोरेल्वेच्या देखभाल दुरुस्तीच्या सुरू असलेल्या कामाला प्रशासनानं आता वेग दिला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून मोनोरेलची चाचणी घेतली जात आहे.



हेही वाचा -

Unlock 4.0: ७ सप्टेंबरपासून मुंबई मेट्रो सुरू होणार, शाळा मात्र बंदच!

मुंबईत कोरोनाचा १२३७ नवे रुग्ण, ३० जणांचा दिवसभरात मृत्यू


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा