Advertisement

एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित


एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटीची सेवा मोफत द्यायचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळं राज्यभरात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नोकरदार, प्रवासी यांच्या घरवापसीसाठी सोमवार ११ मे २०२० पासून मोफत बस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. परंतु, आता महत्वाची बाब म्हणजे एसटीची सेवा मोफत की सशुल्क द्यायची यावरून गोंधळ निर्माण झाला आहे.

हेही वाचा - घरवापसीसाठी एसटीच्या मोफत बस, प्रवासासाठी 'अशी' असेल प्रक्रिया

या गोंधळामुळं आता सोमवारपासून सुरू होणारी सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचं दिसून येते. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. ही सेवा काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान, एसटीची कोणतीही सोय सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत.



हेही वाचा -

कॅन्टीन बंद असल्यानं बेस्ट कामगारांचे हाल

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला युवासेनेचं समर्थन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा