Advertisement

कॅन्टीन बंद असल्यानं बेस्ट कामगारांचे हाल

कॅन्टीन बंद केलं असलं तरी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

कॅन्टीन बंद असल्यानं बेस्ट कामगारांचे हाल
SHARES

लॉकडाऊनच्या काळाच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुक सेवा पुरविणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर कोरोनाचं संकट चांगलंच ओढावलं आहे. कोरोनामुळं बेस्टच्या मजास डेपोतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तसंच २ कर्मचारी संशयित आढळल्यानं डेपोतील कॅन्टीन बंद करण्यात आलं आहे. कॅन्टीन बंद केलं असलं तरी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळं उपाशीपोटी कोरोनाशी कसं लढायचं, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थिती केला आहे.

हेही वाचा - बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्याकरीत दिलासादायक निर्णय

मजास डेपोमधील एका कर्मचाऱ्याचा नुकताच मृत्यू झाला होता. २ कॅन्टीन कामगार संशयित असल्यानं रविवारपासून कॅन्टीन बंद करण्यात आली आहे. कॅन्टीनच्या कामगारांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर हॉस्पिटल इथं उपचारांसाठी पाठवले. तेथून त्यांना गोळी देऊन पुन्हा परत पाठवण्यात आलेले आहे. पण कर्मचाऱ्यांच्या जेवणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याची माहिती मिळते.

हेही वाचा - बेस्टच्या एकूण ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

अनेक चालक बदलापूर, कल्याण-डोंबिवली असे लांबून सेवसाठी येत आहेत. अत्यावश्यक सेवेकरीता घर सकाळी लवकर सोडावं लागत असल्यामुळं त्यांना डबा आणणं शक्य होत नाही. त्यामुळं डेपोच्या कॅन्टीनमध्ये ते जेवण करायचे. परंतु, आता कोरोनाची साथ असल्यामुळं कॅन्टीन बंद करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाशी राहून काम करू नये, असे सांगितले जाते. मात्र, कॅटींन बंद असल्याने कामगारांची गैरसोय होत आहे.



हेही वाचा -

१२ मेपासून पॅसेंजर ट्रेन धावणार

लॉकडाऊनमध्ये केला 'हा' प्रताप, मॉडल पूनम पांडेला अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा