Advertisement

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन रीफ्रेशर कोर्स प्रशिक्षण


रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन रीफ्रेशर कोर्स प्रशिक्षण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं ऑनलाईन प्रशिक्षणातून कामगारांना रिफ्रेश केलं आहे. मध्य रेल्वेनं एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात कुर्ला, कळवा आणि सानपाडा कार शेडमधील ५९ कर्मचारी सहभागी झाले होते. मे आणि जून मध्ये कुर्ला, कळवा आणि सानपाडा या तिन्ही कारशेडमधील २६२ कर्मचारी ईएमयू आढावा घेण्यासाठीच्या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. तसंच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी एका आठवड्याच्या कालावधीचे ऑनलाईन रीफ्रेशर कोर्स प्रशिक्षण बॅचेसमध्ये घेण्यात आले. ज्यामध्ये पहिल्या बॅचमध्ये ७३ आणि दुसर्‍या बॅचमध्ये ५३ अशा १२६ कर्मचाऱ्यांना ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स प्रशिक्षण दिले जाते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मध्य रेल्वेनं माल गाडी आणि पार्सल रेल्वे गाड्या सुरु केल्या. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी २०० उपनगरी लोकल सेवा चालविण्यात येत आहे. या लोकल गाड्यांच्या नियमित देखभालीचे मध्य रेल्वेच्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स सुरु आहे. त्यामुळे कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स मध्य रेल्वेच्या लोकल गाड्याची देखभाल करण्यात येत आहे.


  • नियमित अंतरानं स्थिर रॅकच्या बॅटरी व्होल्टेज तपासणीसह सुरक्षा आणि संरक्षाची तपासणी केली जाते. 
  • १००-५०० मीटर अंतराच्या मुव्हमेंट द्वारे अंडर-गियरचे परीक्षण केलं जातं. 
  • दिवे, पंखे, स्विचेस, पीए / पीआयएस (पब्लिक अड्रेस/ इन्फर्मेशन सिस्टीम) यासारख्या प्रवाशांच्या सुविधांची तपासणी आणि लक्ष पुरविले जातं. 
  • विविध स्टॅबलिंग साइडिंगवर स्थिर सर्व रॅक्सच्या खिडक्या आणि दारे बंद करण्याबरोबर सीलिंग केली जाते
  • सर्व पंटोग्राफ खाली ठेवले जाते.
  • बॅटरी स्विच विलग करण्यात येतो. 
  • स्किडसह सुरक्षित केलेले सुरक्षेच्या उद्देशाने आरपीएफकडे दिले जाते. 
  • कारशेडच्या रेल्वे कामगारांना मध्य रेल्वेकडून ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा देण्यात येत आहे.



हेही वाचा -

Salons Open: २८ जूनपासून सलून सुरू, फक्त केसच कापणार

सामान्य प्रवाशांसाठी लोकल १२ ऑगस्टपर्यंत बंद; लांब पल्ल्यांच्या नियमित गाड्याही रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा