Advertisement

लोकल रद्द, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची मेल एक्स्प्रेसमध्ये गर्दी

मध्य रेल्वे मार्गावरील मेल/एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी आणि सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

लोकल रद्द, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची मेल एक्स्प्रेसमध्ये गर्दी
SHARES

लॉकडाऊनच्या काळात मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना वाहतूकीची सुविधा मिळावी यासाठी लोकल सुरू केली. लोकल सुरू केल्यानंतप पहिल्याच दिवशी लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी केलेली आणि समाजिक अंतराच्या नियमांच उल्लंघन केल्याचं चित्र पाहायला मिळालं. याबाबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्ये रेल्वेनं वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ९३ टक्यांपर्यत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा या मार्गावरील मेल/एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी आणि सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं चित्र पाहायला मिळालं.

हेही वाचा - मर्यादित रेल्वे कर्मचाऱ्यांनाच लोकलनं प्रवास करता येणार


मंगळवारी सकाळच्या सुमारास सुटणारी कर्मचारी लोकल रद्द झाल्यानं मेल, एक्सप्रेसचं जनरलचे डबे सोडण्यात आले आहे. त्यामध्येही कर्मचाऱ्यांनी दाटीवाटीनं प्रवास केल्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्याने रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांची सुरक्षा करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल; सोशल डिस्टंन्सिंगचे तीन-तेरा

कर्मचाऱ्याच्या विशेष लोकलमधील गर्दी आणि दाटीवाटीच्या प्रवासाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये फिजिकल डिस्टिन्सिंग नियमाचं उल्लंघन झालं. या व्हायरल व्हिडिओचा धसका घेत मध्य रेल्वे प्रशासनानं वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या फक्त ७ टक्के केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन हतबल दिसून येत आहे. मेल, एक्स्प्रेसचे जनरल डब्यांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागत असल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडतांना दिसून येत आहे.



हेही वाचा -

मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री प्रयत्नशील

बेस्टच्या ११० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा