Advertisement

कोरोनाच्या अहवालावर क्यूआर कोड बंधनकारक; अन्यथा विमान प्रवासास बंदी

कोरोना अहवालावर क्यूआर कोड नसल्यास आता विमान प्रवास करता येणार नाही. येत्या २२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम लागू केला जाणार आहे.

कोरोनाच्या अहवालावर क्यूआर कोड बंधनकारक; अन्यथा विमान प्रवासास बंदी
SHARES

कोरोना अहवालावर क्यूआर कोड नसल्यास आता विमान प्रवास करता येणार नाही. येत्या २२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम लागू केला जाणार आहे. कोरोना अहवालात फेरफार करून विमान प्रवास केला जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्यानं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं उपरोक्त निर्णय घेतला आहे. 

क्यूआर कोडच्या मदतीनं प्रयोगशाळा आणि अहवाल या दोघांची वैधता तपासली जाणार आहे. अहवालावरील तारीख बदलणं, नाव आणि अन्य मजकुरात फेरफार करून पॉझिटिव्ह रुग्णांनी विमान प्रवासाचा प्रयत्न केल्याच्या घटना मुंबईसह अनेक विमानतळांवर उघडकीस आल्या. त्यामुळं वर्दळीच्या विमानतळांनी आरटी-पीसीआर अहवाल असलेल्या प्रवाशांचीही रँडम तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

काही संशयित प्रवाशांची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह निघाले. त्यांची अधिक चौकशी केली असता जुन्या अहवालात फेरफार केल्याचे समोर झाले. परिणामी अहवालाची सत्यता पडताळण्यासाठी क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम बंधनकारक केला जाईल. 

२२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवासाकरिता क्यूआर कोडसहीत कोरोना निगेटिव्ह अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाची पूर्तता न करणाऱ्यांना विमानात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळं प्रवाशांनी कोरोना चाचणी करताना संबंधित प्रयोगशाळेकडे क्यूआर कोड आधारित अहवाल मागावा, अशी सूचना एअर इंडियानं केली आहे.

क्यूआर कोड का महत्वाचा

  • संबंधित व्यक्तीचा नमुना कोणत्या दिवशी घेतला?
  • अहवाल कधी दिला? 
  • त्यातील खरा निष्कर्ष काय?
  • प्रयोगशाळा मान्यताप्राप्त आहे का?
  • अहवालात फेरफार केला आहे का?



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा