Advertisement

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस १ जुलैपासून रोज धावणार

राजधानी विशेष ट्रेनचे बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालं आहे.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस १ जुलैपासून रोज धावणार
SHARES

मध्य रेल्वेची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी १ जुलैपासून रोज धावणार आहे. हजरत निजामुद्दीन राजधानी आता आठवड्यातून ४ दिवसांऐवजी पूर्ण आठवडा करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या गाडीचा क्रमांक ०१२२१/०१२२२ असा आहे.

राजधानी विशेष ट्रेनचे बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध झालं आहे. अधिकृत तिकीट असणाऱ्यांनाच या विशेष ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. तसंच सर्व प्रवाशांना कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असणार आहे. प्रवाशांकडून याबाबतचे पालन झाले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असं रेल्वे विभागाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेली मुंबई-करमाळी (गोवा) तेजस एक्स्प्रेस (Mumbai-Karmali (Goa) Tejas Express) तेजस एक्स्प्रेस १० जुलैपासून सुरू होणार आहे. 

याशिवाय कोकण रेल्वे १० जुलैपासून ०१२२३/०१२२४ एलटीटी-एर्नाकुलम जन दुरंतो सुपरफास्ट स्पेशल ही ट्रेन पुन्हा सुरू करणार आहे. ह्या ट्रेनमधील सर्व आसने आरक्षीत असणार आहेत. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मुंबई - पुणे डेक्कन क्वीन,  राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-नाशिक (mumbai-nashik) पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. 

मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन २६ तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक झाला आहे. 



हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा