Advertisement

CSMT स्थानकावरील वातानुकुलीत वेटिंग रूमसाठी 'इतके' शुल्क ठरले

मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) इथं एक नवीन वातानुकूलित वेटिंग लाऊंज सुरू केलं आहे.

CSMT स्थानकावरील वातानुकुलीत वेटिंग रूमसाठी 'इतके' शुल्क ठरले
SHARES

मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) इथं एक नवीन वातानुकूलित वेटिंग लाऊंज सुरू केलं आहे. नमह: असं या वेटिंग लाऊंजचं नाव ठेवण्यात आलं आहे. या वेटिंग लाऊंजचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना प्रती तास केवळ १० रुपये आकारण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. की, प्रवाशांच्या प्रवेशावेळी सुरुवातीला ५० रुपये आकारले जातील. यात ४० रुपये प्रारंभी सुरक्षितता ठेवी (advanced) म्हणून आकारले जातील. जेव्हा प्रवासी लाऊंज सोडतील तेव्हा त्यांनी दिलेले ४० रुपये पुन्हा दिले जातील. तर ५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश करता येईल. तर ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रति तास फक्त ५ रुपये शुल्क आकारले जाईल.

हे वेटिंग लाउंज कॉरिडॉर जवळ आहे जे सीएसएमटी मेनलाइन स्टेशनच्या प्रवेशद्वारासह प्लॅटफॉर्म १४, १५, १६, १७ आणि १८ ला जोडते. अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, हे लाऊंज खासगी-सार्वजनिक भागीदारी अंतर्गत चालवलं जातं.

या नवीन वेटिंग रूम / लाउंजमध्ये डायनिंग टेबल, सोफा, टॉयलेट्स, बाथरूम, लायब्ररी, कॅफे, डेडिकेटेड चार्जिंग पॉईंट्स डिस्पोजेबल लिनन किट्स आणि बरेच काही असेल. प्रवाशांना त्यांच्या आगामी रेल्वे प्रवासाविषयी माहिती व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी एलईडी स्क्रीन देखील स्थापित केली आहे. जेणेकरून आगामी गाड्यांचं आगमन आणि सुटण्याच्या वेळा प्रवाशांना कळतील. या लाउंजमध्ये स्पीकर्स देखील असतील जे स्टेशन ऑपरेटरच्या घोषणांना प्रतिबिंबित करेल.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, “आमच्या स्थानकांवर प्रवाशांच्या चांगल्या सुविधा पुरवणं हे उद्दीष्ट आहे. जर मॉडेल यशस्वी ठरले तर आम्ही एलटीटी, दादर, ठाणे आणि कल्याण अशा इतर स्थानकांवर अशीच लाउंज उभारू. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या थांबतात”

“विमानतळांवरील लाऊंजच्या तुलनेत याचे क्षुल्क कमी आहे. सामान्य प्रतीक्षालय विनामूल्य राहतील. रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, यामागील सामान्य कल्पना आहे, असं सुतार यांनी सांगितलं.

नवीन लाऊंज / वेटिंग रूम व्यतिरिक्त सीआरनं प्रवाश्यांसाठी बॅग रॅपिंग आणि सेनिटायझिंगची सुविधासुद्धा सीएसएमटी इथं सुरू केली आहे. सामान आकारानुसार शुल्क ६० ते ८० रुपये दरम्यान निश्चित केलं जाईल.



हेही वाचा

मुंबई - मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सुरू

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत वाहनांच्या खरेदीत वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा