Advertisement

'सीएसएमटी'तील दुहेरी सरकत्या जिन्याचं काम अंतिम टप्प्यात


'सीएसएमटी'तील दुहेरी सरकत्या जिन्याचं काम अंतिम टप्प्यात
SHARES

येत्या काही दिवसांतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सरकत्या जिन्याचा अनुभव घेता येणार आहे. कारण सीएसएमटी स्थानकातील १८ नंबर प्लॅटफॉर्मवर उभारण्यात येणाऱ्या दुहेरी सरकत्या जिन्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पुढच्या २ ते ३ दिवसांत या सरकत्या जिन्याचं काम पूर्ण होईल, असं म्हटलं जात आहे.

या सरकत्या जिन्याची कर्मचाऱ्यांकडून यशस्वी चाचणीही करण्यात आली आहे. सरकत्या जिन्यासाठी काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यानेच ही माहिती दिली. अजून २ ते ३ दिवसांत या दुहेरी सरकत्या जिन्याचं काम पूर्ण होईल. जिन्याच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. थोडंसं काम शिल्लक आहे, ते झालं की सरकता जिना प्रवाशांसाठी खुला होईल, असं या कर्मचाऱ्याने सांगितलं.



प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरही सरकता जिना

शिवाय, सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर देखील सरकत्या जिन्याचं काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आलं आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं कर्मचाऱ्याने सांगितलं. त्यामुळे, मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात दुहेरी सरकत्या जिन्याचा प्रवास करण्याचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील दूर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यात एक महत्त्वाचा निर्णय होता उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवण्याचा. शिवाय, केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी २०१८ च्या अर्थसंकल्पातही रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सरकते जिने, लिफ्ट बसवण्यासाठी तरतूद केली आहे. त्यानुसार लवकरच रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सरकते जिने दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.



हेही वाचा-

सीएसटीत पहिल्यांदाच 'दुहेरी' सरकता जिना


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा