Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

वयोमान संपलेली रिक्षा रस्त्यावर, चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद


वयोमान संपलेली रिक्षा रस्त्यावर, चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद
SHARES

मुंबईच्या रस्त्यांवर १५ वर्षे धावलेल्या रिक्षा आणि २० वर्षे वयोमान संपलेल्या टॅक्सी भंगारात काढून रस्त्यांवरून बाजूला कराव्यात, असे नियम असतानाही सद्यस्थितीत मुंबईच्या रस्त्यावर जुन्या रिक्षा-टॅक्सी धावत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहेत.


तक्रारीची नोंद

दहिसर इथं परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत ही बाब उघडकीस आली आहे. त्यानुसार वयोमान संपलेली रिक्षा चालवणारा रिक्षा चालक दिनेश देवलकर याच्या विरोधात बोरीवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


कारवाईचे आदेश

मुंबईच्या रस्त्यांवर १५ वर्षे धावलेल्या रिक्षांचं वयोमान संपल्यानंतरही या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सातत्याने येत होत्या. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षकांना परिवहन विभागाकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.


कागदपत्रांशिवाय रिक्षा

या आदेशाप्रमाणे वस्तुस्थिती तपासण्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी सचिन आयरेकर यांनी बुधवारी १ च्या सुमारास दहिसरच्या नवागाव, मेरिमेक्युलेट शाळेसमोर तपासणी सुरू केली. त्यावेळी देवलकरच्या रिक्षावर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. परंतु देवलकरकडे रिक्षाची कागदपत्रे नव्हती.


तक्रारीची नोंद

कारण त्याच्या रिक्षाची नोंदणी २००२ साली करण्यात आली होती. वयोमान उलटल्यानंतरही देवलकर भंगारातील रिक्षा चालवत असल्याचं लक्षात आल्यानंतर आयरेकर यांनी एमएचबी पोलिस ठाण्यात देवलकर विरोधात तक्रार नोंदवली. मालवणी पोलिसात देखील अशा गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हेही वाचा-

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गुन्ह्यांचं अाव्हान - पोलिस आयुक्त

विकृत तरूणाचे पनवेल-अंधेरी लोकलमध्ये अश्लील चाळे!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा