शुक्रवारी ठरणार बेस्ट संपाचा निर्णय

  Mumbai
  शुक्रवारी ठरणार बेस्ट संपाचा निर्णय
  मुंबई  -  

  गेल्या चार महिन्यांचा पगारच मिळत नसल्याने मुंबई बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केयूटी समितीकडून मंगळवारी मतदान घेण्यात आले होते. त्यातून 97 टक्के कामगारांनी संपाला पाठिंबा दर्शवला आहे.

  बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी हे मतदान घेण्यात आले होते. मुंबईमधील सर्व आगारातून हे मतदान पार पडले. यामध्ये बेस्ट उपक्रमातील परिवहन आणि सामान्य प्रशासनातील एकूण 19 हजार 94 कर्मचाऱ्यांनी मतदान केले होते. त्यात 18,537 कार्मचाऱ्यांनी संपासाठी कौल दिला तर, 496 कर्मचाऱ्यांनी संप करू नये यासाठी मतदान केले. पण कृती समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी संपाची भूमिका ठरणार आहे.


  काय आहेत मागण्या?

  • करार ठरल्याप्रमाणे कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मासिक वेतन द्या
  • रखडलेले वेतन द्या
  • तिकिटासाठी असलेली ना दुरुस्त ट्रायमॅक्स मशीन तात्काळ बदलून द्या
  • ड्यूटी शेड्युल नियमितप्रमाणे करा
  • कॅनडा शेड्युल रद्द करा  हेही वाचा - 

  बेस्टला वाचवण्यासाठी टीसीच वाटतायत पत्रकं!

  बेस्ट तोट्यातच : महापौरांची बैठकीची चौथी फेरी निष्फळ


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.