Advertisement

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड व्हायरमध्ये बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ओव्हरहेड व्हायरमध्ये बिघाड झाला आहे.

ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. या बिघाडामुळं कुर्लाहून सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक अर्धा तास उशिरानं सुरू आहे


प्रवाशांच्या त्रासात भर

हार्बर रेल्वेची वाहतूक अर्धातास उशीरानं सुरू असल्यामुळं कुर्ला स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. मुंबईत वाढलेल्या उकाड्यामुळं प्रवासी हैराण झाले आहेत. अशातच ऐन दुपारच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.


दुरुस्तीचं काम हाती

रेल्वे प्रशासनानं या बिघाडाची दखल घेतली असून, दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. दरम्यान, रविवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. तसंच, मालगाडीच्या मागे दोन कसारा लोकल रखडल्या होत्या.



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १० टक्केच पाणीसाठी

'विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप पक्षांची युती राहणार कायम' - चंद्रकांत पाटील



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा