Advertisement

पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या लोकल पासला मुदतवाढ


पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या लोकल पासला मुदतवाढ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सर्वसामान्यांचा लोकल प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. पण या प्रवासासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डॉस घेणं गरजेचं आहे. ज्या प्रवाशांचे २ डोस पूर्ण झाले असतील त्यांना लोकलचा पास घेऊन लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु असं असलं तरी अनेक प्रवाशांनी लॉकडाऊन आधी लोकल पास काढले होते. त्यामुळं या पासच काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या या प्रश्नाला पश्चिम रेल्वेनं पूर्णविराम दिला आहे.

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेआधी लोकल रेल्वेचा पास काढलेल्या सामान्य नागरिकांच्या त्या पासला आता उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या  जुन्या पासला उर्वरित दिवसांसाठी मुदतवाढ न दिल्याने नाइलाजाने नवा पास काढावा लागत होता.

एकीकडे मध्य रेल्वेने मुदतवाढीची अंमलबजावणी सुरू केली असतानाच पश्चिम रेल्वेला मात्र त्याचा विसर पडला होता. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट येताच सामान्यांच्या लोकल प्रवासावर एप्रिल २०२१ पासून निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्टपासून प्रवासमुभा दिली होती. परंतु पासला मुदतवाढ दिली नव्हती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा