रमजान ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

रमझान ईदनंतर गुरुवारी बासी ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रवाशांची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे १३१ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

SHARE

मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण मानला जाणारा 'रमझान ईद' हा सण सर्वत्र मोठ्या जल्लोषात, आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव घराबाहेर पडत अाहेत. तसंच, रमझान ईदनंतर गुरुवारी बासी ईद साजरी करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रवाशांची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टतर्फे १३१ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


१३१ जादा बसगाड्या

बसमार्ग क्रमांक ३, ४ मर्या., ७ मर्या. ,८ मर्या., २१ मर्या., २२ मर्या., २८, ३० मर्या., ३३, ३७, ४५, ५९, सी-७१ जलद, ७७, ८५, ८६,,८७ मर्या. ,८८, १०८, १११, १२४, १२५, १३४, १८० बसमार्गांचा त्यात समावेश आहे. त्यासह, २०३, २११, २२४, २३१, २४१, २५६, २६९ ,२७१, २७२, २७३, ३०२, ३०३, ३०५, ३२६, ३५५ मर्या., ३५७, ३७६, ३९६ मर्या., ४०३, ४०८, ४२२, ४९६ मर्या., ५०१ मर्या., ५२१ मर्या., ५२४ मर्या., ५३३ मर्या.,५४५ मर्या.,७०६ मर्या.,७१८ मर्या.,आदी मार्गावर एकूण १३१ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

या बसगाड्या दुपारी २ वाजल्यानंतर सोडण्यात येणार आहेत. तसंच, प्रवाशांची गर्दी वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात जादा बसगाड्या सोडण्याची व्यवस्था देखील बेस्टकडून करण्यात आली आहे.हेही वाचा -

माथेरानची मिनी ट्रेन ७ जूनपासून बंद

महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार कापलेलं वेतनसंबंधित विषय
ताज्या बातम्या

रमजान ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या
00:00
00:00