Advertisement

चर्चगेट ते बोरीवली लेडिज स्पेशल ट्रेनला २६ वर्षे पूर्ण

सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेद्वारे सकाळी बोरीवली, भाईंदर, वसई रोड आणि विरार स्थानकांतून लेडिज स्पेशल ट्रेन सोडण्यात येतात. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळेस चर्चगेट स्थानकातून बोरीवली, भाईंदर आणि विरार (दोन फेऱ्या) ४ लोकल चालवण्यात येत आहेत.

चर्चगेट ते बोरीवली लेडिज स्पेशल ट्रेनला २६ वर्षे पूर्ण
SHARES

लोकलच्या चेंगराचेंगरीतून महिला प्रवाशांना दिलासा देण्याच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आलेल्या पहिल्या लेडिज स्पेशल ट्रेनला शनिवारी ५ मे रोजी २६ वर्षे पूर्ण झाली. लेडिज स्पेशल ट्रेन सर्वात पहिल्यांदा ५ मे १९९२ रोजी सुरू करण्यात आली होती.

स्पेशल ट्रेनची गरज काय?

सन १९९० नंतर वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे नोकरी-व्यवसायानिमित्त लोकल प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या कमालिची वाढली. लोकल ट्रेनच्या गर्दीत या महिला प्रवाशांना विशेष सेवा देण्याच्या निमित्ताने ही सेवा सुरू करण्यात आली.

किती फेऱ्या?

सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेद्वारे सकाळी बोरीवली, भाईंदर, वसई रोड आणि विरार स्थानकांतून लेडिज स्पेशल ट्रेन सोडण्यात येतात. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळेस चर्चगेट स्थानकातून बोरीवली, भाईंदर आणि विरार (दोन फेऱ्या) ४ लोकल चालवण्यात येत आहेत.

मध्य रेल्वेवरही सुविधा

पश्चिम रेल्वेने १९९३ मध्ये लेडिज स्पेशल लोकलची सेवा विरारपर्यंत नेली. त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या पावलावर पाऊल ठेवल मध्य रेल्वेनेही १ जुलै १९९२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान पहिली लेडिज स्पेशल ट्रेन सुरू केली. सद्यस्थितीत सीएसटीएम ते कल्याण आणि सीएसटीएम ते पनवेल मार्गावर एकूण ४ लेडिज स्पेशल लोकल चालवण्यात येत आहेत.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोकल ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, टाॅकबॅक यंत्रणा लावण्याचा पुढाकारही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

हेही वाचा-

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई-करमाळी अतिरिक्त ६ स्पेशल ट्रेन्स

मेट्रोमध्येही आता फर्स्टक्लास!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा