Advertisement

मेट्रोमध्येही आता फर्स्टक्लास!


मेट्रोमध्येही आता फर्स्टक्लास!
SHARES

वातानुकुलित मेट्रोमध्ये लोकलप्रमाणे फर्स्टक्लास वैगेरे असा काही प्रकार अजून तरी नाही. पण यापुढे मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या आगामी मेट्रो प्रकल्पात फर्स्टक्लास हा प्रकार असणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. चेन्नई मेट्रोच्या धर्तीवर मुंबई मेट्रोमध्येही एक मेट्रो डब्बा फर्स्टक्लास म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.


सर्व मेट्रोंमध्ये 'फर्स्ट क्लास'चा डब्बा

एमएमआरडीएकडून मेट्रो-2 अ आणि मेट्रो 2 ब प्रकल्पांचं प्रत्यक्ष काम सुरू असून मेट्रो-7 च्याही कामाला सुरूवात झाली आहे. तर आता लवकरच मेट्रो-4, मेट्रो-5 आणि मेट्रो-6 च्या कामालाही सुरूवात होणार आहे. असं असताना आता या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये फर्स्टक्लासचा डब्बा राखीव ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतला आहे.


अॅडव्हान्स बुकिंग करावं लागणार!

मेट्रो पूर्णत: वातानुकुलित असल्यानं फर्स्टक्लास हा प्रकार मेट्रोमध्ये नाही. पण गर्दीच्या वेळी प्रवाशांची थोडी गैरसोय होते. त्यामुळे एक डब्बा फर्स्टक्लास म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एमएमआरडीएचं म्हणणं आहे. त्यानुसार सहा डब्बे असलेल्या मेट्रोतील एक डब्बा राखीव असेल आणि त्यासाठी प्रवाशांना आधी बुकींग करावं लागणार आहे. फर्स्टक्लाससाठी बुकींग केलं म्हणजे तुमची मेट्रोतील जागा राखीव होणार आहे. पण त्यासाठी प्रवाशांना मेट्रोच्या सर्वसाधारण तिकीट दरांपेक्षा जादा दर मोजावे लागणार आहेत.


अनेक नव्या सुविधांचाही समावेश

महत्त्वाचं म्हणजे यापुढच्या सर्वच मेट्रो गाड्यांमधील आसनव्यवस्था सध्याच्या मेट्रोपेक्षा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. त्यानुसार वायफाय सुविधा, मोबाईल चार्जिंगची सोय, पुशबॅक सीट अशा अनेक सुविधा मेट्रोमध्ये देण्यात येणार आहेत.



हेही वाचा

४० कोटी प्रवाशांची 'मेट्रो सफर'

मेट्रो कारशेड आरेमध्येच, विकास आराखड्यात शिक्कामोर्तब


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा