Advertisement

एमएमआरडीएचा 'मेट्रो' संकल्प, ४,७०० कोटींची तरतूद

एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात प्रामुख्याने मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रकल्पांवर भर देण्यात आल्याने या अर्थसंकल्पाला 'मेट्रो'संकल्प असंच रूप आलं आहे.

एमएमआरडीएचा 'मेट्रो' संकल्प, ४,७०० कोटींची तरतूद
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) चा २०१८-१९ साठी १२ हजार १५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरूवारी जाहीर झाला. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो प्रकल्पांवर भर देण्यात आल्याने या अर्थसंकल्पाला 'मेट्रो'संकल्प असंच रूप आलं आहे.


मेट्रोसाठी किती तरतूद?

येत्या वर्षात ७ मेट्रो प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं असून या ७ मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दहिसर ते डी.एन. नगर मेट्रो-२ अ मार्गासाठी १ हजार ५८८ कोटींची, अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ साठी १ हजार २६२ कोटींची, डी.एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब साठी ७०० कोटींची, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ साठी ५०० कोटींची, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ साठी ४५० कोटींची, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ साठी १०० कोटींची, तर स्वामी समर्थ नगर-जेव्हीएलआर-सीप्झ-विक्रोळी मेट्रो-६ मार्गासाठी १०० कोटींची अशी एकूण ४ हजार ७०० कोटींची तरतूद या मेट्रो प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे.


'एमटीएचएल'साठी २,१०० कोटी

मेट्रोनंतर 'एमएमआरडीए'साठी महत्त्वाकांक्षी असणारा प्रकल्प म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक. या प्रकल्पासाठी २ हजार १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


जलस्त्रोतांचा विकास

तर मुंबई महानगर प्रदेशातील जलस्त्रोतांचा विकास करण्यासाठी ५८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४०३ एलएलडी सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचं काम काही महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.


मुंबईत एकही नवा प्रकल्प नाही

मेट्रो, सी लिंकसह मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांचं जाळं विकसित आणि मजबूत करण्याचं उद्दीष्ट्यही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं आहे. रस्ते विकासासाठी एमएमआरडीएनं १ हजार २९० कोटींची तरतूद केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात जुनेच प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा 'एमएमआरडीए'कडून मुंबईत कोणताही नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता नाही.



हेही वाचा-

अंधेरी मेट्रो स्थानकावर येणार प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर!

मेट्रो-४ ची धाव आता गायमुखपर्यंत, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा