Advertisement

अंधेरी मेट्रो स्थानकावर येणार प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर!

स्वयंचलित अशा या प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअरमुळे प्रवासी ट्रॅकवर उतरू शकणार नसल्यानं आत्महत्या वा इतर गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमओपीएलकडून केला जात आहे. तर गर्दीला आवरणेही यामुळे सोपे होणार आहे.

अंधेरी मेट्रो स्थानकावर येणार प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर!
SHARES

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने आता मेट्रो स्थानकावर प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर (पीएसडब्ल्यु) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एमएमओपीएलने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) परवानगी मागितली असून ही परवानगी मिळाल्याबरोबर कामाला सुरूवात करण्याचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



गैरप्रकार टाळण्यासाठी घेतला निर्णय

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या वेळी आंदोलक असल्फा मेट्रो स्थानकातील मेट्रो ट्रॅकवर उतरले होते. ट्रॅक रोखून धरत या आंदोलकांनी मेट्रो सेवाच बंद पाडली होती. तर याआधी मेट्रो ट्रॅकवर उडी मारत एकाने आत्महत्याही केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एमएमओपीएलने प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर लावण्याचा निर्णय घेतला आहे.


एमएमआरडीए परवानगी देईना!

मेट्रो-१ प्रकल्पातील २६ टक्के हिस्सा एमएमआरडीएचा आहे. त्यामुळे या कामासाठी एमएमआरडीएच्या परवानगीची गरज एमएमओपीएलला लागणार आहे. त्यानुसार चार महिन्यांपूर्वीच एमएमओपीएलने परवानगी मागितली असून यासंबंधीचे पत्र 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागले आहे. यासंबंधी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.




सर्वच मेट्रो स्थानकांवर बसवणार स्क्रीन डोअर

स्वयंचलित अशा या प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअरमुळे प्रवासी ट्रॅकवर उतरू शकणार नसल्यानं आत्महत्या वा इतर गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचा दावा यानिमित्ताने एमएमओपीएलकडून केला जात आहे. तर गर्दीला आवरणेही यामुळे सोपे होणार आहे. दरम्यान, मेट्रो-१ मधील अंधेरी मेट्रो स्थानकावर सर्वात आधी प्लॅटफाॅर्म स्क्रीन डोअर लावण्यात येणार असून त्यानंतर हळूहळू इतर मेट्रो स्थानकांवरही असे डोअर लावण्यात येणार आहेत.



हेही वाचा

महिला प्रवाशांनो, घाबरू नका! आलंय मेट्रोचं 'सिक्युअर अॅप'


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा