Advertisement

महिला प्रवाशांनो, घाबरू नका! आलंय मेट्रोचं 'सिक्युअर अॅप'

मेट्रो रेल्वे वा मेट्रो स्थानकात प्रवाशांबरोबर एखादा गैरप्रकार घडत असेल वा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर प्रवाशांनी त्वरीत या अॅपवरील सिक्युअर बटण दाबावं. हे बटण दाबल्याबरोबर 'एमएमओपीएल'च्या सुरक्षा नियंत्रण कक्षाला यासंबंधीची सूचना मिळेल.

महिला प्रवाशांनो, घाबरू नका! आलंय मेट्रोचं 'सिक्युअर अॅप'
SHARES

दोन महिन्यांपूर्वी एअरपोर्ट मेट्रो स्थानकावर भर दिवसा एका महिलेचा विनयभंग झाला होता. या घटनेने मेट्रो प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत असल्याचा राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) चा दावा साफ खोटा ठरवला. त्याचवेळी लोकलप्रमाणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यामहिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही एेरणीवर आला. या घटनेने खडबडून जागं झालेल्या 'एमएमओपीएल'ने अखेर महिला प्रवाशांसह सर्वच मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'मेट्रो सिक्युअर' नावाने एक सुरक्षा अॅप तयार केला असून या अॅपचं गुरूवारी अनावरण करण्यात आलं. आयवाॅच इंडिया कंपनीने हे अॅप तयार केलं असून ही कंपनी या अॅपचं व्यवस्थापन करणार आहे.


कसं वापरायचं अॅप

मेट्रो रेल्वे वा मेट्रो स्थानकात प्रवाशांबरोबर एखादा गैरप्रकार घडत असेल वा कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर प्रवाशांनी त्वरीत या अॅपवरील सिक्युअर बटण दाबावं. हे बटण दाबल्याबरोबर 'एमएमओपीएल'च्या सुरक्षा नियंत्रण कक्षाला यासंबंधीची सूचना मिळेल.

महत्त्वाचं म्हणजे हे बटण दाबल्याबरोबर प्रवासी जिथे कुठे म्हणजेच मेट्रो ट्रेन वा मेट्रो स्थानकावर असेल तिथला व्हिडिओ सुरक्षा नियंत्रण कक्षाला मिळेल आणि त्या प्रवाशाचं ठिकाण कक्षाला समजेल.



३० सेकंदात मदत

त्याबरोबर ३० सेकंदाच्या आत सुरक्षा रक्षक त्या प्रवाशापर्यंत पोहोचून प्रवाशांची अडचण दूर करतील. त्यातही महिला प्रवाशांबरोबर काही गैरप्रकार होत असेल तर त्याप्रकरणी त्वरीत कडक कारवाई करतील, अशी माहिती 'एमएमओपीएल'कडून देण्यात आली आहे.


मित्र, कुटुंबियही मदतीला

या अॅपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजं या अॅपमध्ये प्रवाशांनी आपल्या कुटुंबापैकी वा मित्रांपैकी ज्या कुणाचा क्रमांक नोंदवला असेल त्यांच्या मोबाईलवरही त्वरीत अलर्ट आणि व्हिडिओ जाईल. जेणेकरून कुटुंबिय आणि मित्र-नातेवाईकही त्वरीत मदतीसाठी पोहोचू शकतील.

त्यामुळे हे अॅप प्रवासी त्यातही महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरेल, असा विश्वास 'एमएमओपीएल'ने व्यक्त केला आहे. असं अॅप देशातील पहिलं अॅप असल्याचा दावाही 'एमएमओपीएल'ने केला आहे.



हेही वाचा-

अरे व्वा! अवघ्या महिन्याभरात १ कोटी मुंबईकरांची 'मेट्रो सफर'

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा