Advertisement

मेट्रोमध्ये खाद्यपदार्थांना ‘नो एन्ट्री’

मेट्रोमधील स्वच्छतेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला घेतला आहे. तसंच मेट्रोमध्ये यासंबंधीत उद्घोषणादेखील करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांबाहेरही यासंबंधी सुचना फलक लावण्यात आले आहेत.

मेट्रोमध्ये खाद्यपदार्थांना ‘नो एन्ट्री’
SHARES

मुंबई मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ नेण्यावर मुंबई मेट्रो प्रशासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना मेट्रोमध्ये केवळ पाणी घेऊन प्रवास करता येणार आहे.  नियमाचं उल्लंघन झाल्यास संबंधीत प्रवाशाकडून दंड आकारला जाणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.


प्रवासी जागरूकता अभियान 

मेट्रोमधील स्वच्छतेसाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला घेतला आहे. तसंच मेट्रोमध्ये यासंबंधीत उद्घोषणादेखील करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांबाहेरही यासंबंधी सुचना फलक लावण्यात आले आहेत. १३ मार्चपर्यंत प्रवासी जागरूकता अभियान चालवण्यात येणार असून यानंतर कोणत्याही प्रवाशाने या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाणार असल्याचं मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मेट्रो कायद्यानुसार मेट्रोमध्ये खाद्यपदार्थांचं सेवन करणं हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच यामुळे सहप्रवाशांनाही समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांवरच संपवावे लागणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 


जनजागृतीसाठी डिजिटल स्क्रिन

मेट्रोच्या सर्व स्थानकांवर यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एक डिजिटल स्क्रिन लावण्यात येणार आहे. तसेच मेट्रोच्या डब्यांमध्येही स्क्रिनवरून खाद्यपदार्थांचं सेवन करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती दिली जाणार आहे. मेट्रोच्या प्रवाशांनी मेट्रोच्या स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे सुखकर आणि स्वच्छ वातावरणात प्रवासासाठी प्रवाशांनी मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

६ वर्षात लोकलमधून ९९ कोटींचे मोबाइल चोरीला

एसी लोकलची चाचणी मध्य रेल्वेवर

बेस्ट बसमध्येही होणार पुढील थांब्याची घोषणा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा