Advertisement

मस्जिद स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला


मस्जिद स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला
SHARES

मस्जिद स्थानकातील सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं जाणारा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनं हा पूल अवघ्या ३३ दिवसांत बांधला आहे. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जुना पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. त्याचप्रमाणं, हा पादचारी पूल ४५ दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली होती. मात्र, या पुलाचे बांधकाम ३३ दिवसांमध्ये मध्य रेल्वेनं पूर्ण केले आहे.



४.८८ मीटरचा पूल

मस्जिद स्थानकात जुना पादचारी पूल पाडून नवा ४.८८ मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा डेक पूर्वी २.४४ मीटर रुंद होता. नवीन पुलाचा डेक ४.८८ मीटर इतका रुंद करण्यात आला आहे. तसंच, पुलाच्या पायऱ्या २.४४ मीटर इतक्या रुंद होत्या. त्या पायऱ्या देखील ३.६६ मीटर इतक्या रुंद करण्यात आल्या आहेत.

 

१.२५ कोटींचा खर्च

या पुलाच्या दुसऱ्या बाजूकडील पायऱ्यांची रुंदी १.८० मीटर होती. या पायऱ्या २.३० मीटर इतक्या रुंद करण्यात आल्या अाहेत.  या पूलाच्या बांधण्यासाठी मध्य रेल्वेला १.२५ कोटी रुपये इतका खर्च आला आहे.


सांताक्रूझ स्थानकातील पादचारी पूल खुला

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ स्थानकातील पादचारी पूल देखील १ मंगळवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. पुर्व पश्चिमेला जोडणारा हा पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर महिन्यापासून बंद ठेवण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे. या पुलावरून सांताक्रूझ स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर पोहोचणे शक्य होणार आहे. दरम्यान, पूलाच्या पूर्वेकडील जिने बंद आहेत.



हेही वाचा - 

शेवटचा दिवसही घसरणीचाच, माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावरून घसरली

नवीन वर्षात प.रे.वर होणार ३४ पादचारी पूल, ८५ सरकते जीने, ५९ लिफ्ट




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा