Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीचं बुकिंग 'या' तारखेपासून सुरू

यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ (MSRTC) सज्ज झाले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीचं बुकिंग 'या' तारखेपासून सुरू
SHARES

दरवर्षी हजारो चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातून कोकणात जातात. यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ (MSRTC) सज्ज झाले आहे.

यंदाच्या गणेशोउत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500 जादा गाड्या (ST Bus) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील विविध ठिकाणांहून या गाड़्या सुटणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ पाहणाऱ्या हजारो कोकणवासीयांना याचा फायदा होणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दिनांक 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

मुंबई सेंट्रल: मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफपरेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी

परळ: परळ सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरीहेही वाचा

कोकणच्या सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार

मुंबईत लवकरच धावणार एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा