Advertisement

रेल्वे प्रवासासाठी लागणाऱ्या रेल्वे पासची विक्री ४ लाखांहुन अधिक


रेल्वे प्रवासासाठी लागणाऱ्या रेल्वे पासची विक्री ४ लाखांहुन अधिक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला सर्वसामान्यांचा लोकल प्रवास आता सुरू करण्यात आला आहे. या प्रवासासाठी रेल्वे पासाची आवश्यकता असून, हा पास केवळ कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या प्रवाशांना दिला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरण झाल्यामुळे मासिक पास घेणाऱ्यांची संख्या वाढत असून आतापर्यंत ४ लाखांहून अधिक पासची विक्री झाल्याची माहिती रेल्वेने दिली. मध्य रेल्वेवर सर्वाधिक पास विक्री झाली आहे. मध्य रेल्वेवर आतापर्यंत दोन लाख ७४ हजाराहून अधिक पासची विक्री झाल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वेवर हीच संख्या एक लाख २५ हजार ४७३ एवढी आहे.

मध्य रेल्वेवर सर्वाधिक पासची विक्री डोंबिवली स्थानकात झाली आहे. त्यापाठोपाठ कल्याण, ठाणे, बदलापूर, इत्यादी स्थानकातूनही पासांची खरेदी झाली आहे. पश्चिम रेल्वेवरही बोरीवली, भाईंदर, कांदिवली,अंधेरी, गोरेगाव इत्यादी स्थानकातून सर्वाधिक मासिक पास घेण्यात आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा