Advertisement

बेस्ट बसमध्ये 'यांना' करता येणार मोफत प्रवास

११ डिसेंबरपासून सवलत सुरू करण्यात आली आहे.

बेस्ट बसमध्ये 'यांना' करता येणार मोफत प्रवास
SHARES

बेस्ट बसमधून दिव्यांग प्रवासी, ज्येष्ठ नागरीक आणि महिला प्रवाशांसाठी यापूर्वीच आसने राखीव ठेवण्यात आली आहेत. गर्भवती आणि तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना बसमध्ये पुढील दरवाजाने प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय ४० टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. 

दिव्यांग प्रवाशांप्रमाणेच आता ऑटिस्टिक व्यक्तींनाही मोफत प्रवास देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. सोमवार, ११ डिसेंबरपासून या सवलतीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ऑटिस्टिक व्यक्तींनाही बेस्ट बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. 

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑटिस्टिक व्यक्तींनी संबंधित वैद्यकीय शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या आजारपणाबाबत प्रमाणपत्र उपलब्ध करणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या साहाय्याने बेस्ट उपक्रमाच्या बस आगारातून त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या स्मार्टकार्डवर आधारित बसपास अथवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या बसपासची मुदत एक वर्ष राहील.

एक वर्षानंतर नव्याने प्रमाणपत्र सादर केल्यावर बसपासचे नूतनीकरण करण्यात येईल. सध्या १८ ते १९ हजार दिव्यांग प्रवासी मोफत प्रवासाची सुविधा घेत असून त्यासाठी त्यांना स्मार्ट कार्डही उपलब्ध केले आहे.



हेही वाचा

बीएमसी मार्शल्सची आता मुंबईतील बेकायदेशीर पार्किंगवर नजर

नेरळ-माथेरान शटल सेवेतून 3 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा