Advertisement

परतीच्या प्रवासाकरीता गणेशभक्तांची 'या' वाहतुकीला पसंती

दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर २३ ऑगस्टपासून प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

परतीच्या प्रवासाकरीता गणेशभक्तांची 'या' वाहतुकीला पसंती
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ऐन गणेशोत्सवात एसटी व रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेतला ३ महिने अगोदरच प्रवाशी तिकीटांचं आरक्षण करतात. परंतु, यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्यानं वाहतुकीबाबत निर्णय उशीरा घेण्यात आला. मात्र, निर्णयास विलंब झाल्यानं गणेशोत्सवाकरिता मुंबईहून कोकणात गेलेल्या एसटी-रेल्वेगाड्या रिकाम्या गेल्या. मात्र, परतीच्या प्रवासासाठी एसटी, विशेष रेल्वेगाड्यांना प्रवाशांनी पसंती दिली आहे.

दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर २३ ऑगस्टपासून प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. अनेकांनी परतीच्या प्रवासासाठी खासगी वाहनांपेक्षा एसटी, रेल्वेलाच पसंती दिली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर ५ ऑगस्टपासून एसटी महामंडळाने मुंबईतून बस सोडण्यात आल्या. त्यातही १२ ऑगस्टनंतर जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही.

५ दिवसांच्या गणपती विसर्जनानंतरच म्हणजे २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. २ सप्टेंबपर्यंत एसटीच्या १८२ गाड्यांचे गट आरक्षित आहेत. १७५ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण झाले असून उर्वरित ४९८ गाड्यांचे आरक्षणही पूर्ण होत आले आहे. २७ ऑगस्टला ४३ गाड्या, २८ ऑगस्टला १९२ गाड्यांपैकी १५ गट आणि २७ वैयक्तिक बस आरक्षण पूर्ण झाले आहे.

२८ ऑगस्टला सावंतवाडी ते सीएसएमटीसाठी (गाडी क्रमांक १११०) ९०३ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. २९ ऑगस्टला या गाडीचे १,३०५, ३० ऑगस्टला १,०९६, तर ५ सप्टेंबरला १,१५५ प्रवाशांचे आरक्षण झाले आहे. अन्य गाड्यांनाही चांगला प्रतिसाद आहे.



हेही वाचा -

आश्चर्य! गणेशोत्सवात पहिल्यांदाच लालबाग, परळ शांत

दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा