Advertisement

डिसेंबरपासून धावणार गोरेगाव-पनवेल लोकल


डिसेंबरपासून धावणार गोरेगाव-पनवेल लोकल
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव स्थानकावरून सध्या काही मोजक्या लोकल ट्रान्स हार्बर मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सोडण्यात येत आहेत. त्यात सद्यस्थितीत पनवेल लोकलचा समावेश नसला, तरी लवकरच या मार्गावरही लोकल धावू लागेल. कारण डिसेंबरपासून गोरेगाव ते पनवेल दरम्यान लोकल सुरू करण्याचा पश्चिम रेल्वे विचार करत आहे.


सद्यस्थिती काय?

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरीपर्यंतचा हार्बर मार्ग विस्तारीत करून तो गोरेगावपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार गोरेगाववरूनही काही लोकल 'सीएसएमटी'साठी सोडण्यात येत आहे. परंतु यामध्ये पनवेल लोकलचा समावेश नसल्याने प्रवाशांना पनवेलला जाण्यासाठी अंधेरीला उतरावं लागत आहे. कारण सद्यस्थितीत अंधेरी स्थानकावरूनच पनवेलसाठी लोकल गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांची हा त्रास दूर करण्याचं पश्चिम रेल्वेने ठरवलं आहे.


बोरीवलीपर्यंत विस्तार

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते नवीन वेळापत्रकाप्रमाणे गोरेगाव आणि अंधेरी दरम्यान नवीन लोकल सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या नवीन लोकल सुरू होतील. त्यात पनवेल लोकलचाही समावेश आहे. मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणा (एमआरव्हीसी)ने बोरीवलीपर्यंत हार्बर मार्ग विस्तारीत करण्याचं ठरवलं आहे. हा मार्ग २०२३ पर्यंत विस्तारीत करण्याचं प्राधिकरणाने ठरवलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा