फुकट्या प्रवाशांना रेल्वे म्हणते, 'तेरा टाईम आएगा'

'अपना टाईम आयेगा' या गाण्याच्या चालीवर 'तेरा टाईम आयेगा' हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं खास रेल्वे प्रवाशांसाठी तयार करण्यात आलं आहे.

SHARE

बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या 'गली बॉय' या चित्रपटातील गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटातील 'आझादी' आणि 'अपना टाईम आएगा' या गाण्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. मात्र या गाण्याची भूरळ केवळ सामान्यांनाच नाही, तर खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना देखील पडली आहे. 'अपना टाईम आयेगा' या गाण्याच्या चालीवर 'तेरा टाईम आयेगा' हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं खास रेल्वे प्रवाशांसाठी तयार करण्यात आलं आहे. तसंच, पियुष गोयल यांनी या गाण्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

रेल्वेतून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याचा फटका भारतीय रेल्वेला बसतो. हीच बाब लक्षात घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं अपना टाईम आएगा या गाण्याचा रिमेक केला आहे. तेरा टाईम आएगा असे या गाण्याचे बोल आहेत. या व्हिडीओमध्ये टीसीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

गाण्याच्या व्हिडीओच्या शेवटी विनातिकीट प्रवास करणं चुकीचं आहे असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय तिकीट काढण्यासाठी रांगेत उभं न राहता युटीएस अॅप, एटीव्हीएम या प्रगत सुविधांना प्राधान्य देण्याचा संदेश गाण्यात देण्यात आला आहे. 'अपना टाईम आयेगा' हे गाणं सध्या स्टेटसपासून एखाद्या फोटोच्या कॅप्शनसाठीही वापरण्यात येत आहे. मात्र, रेल्वे मत्र्यांनच्या या 'तेरा टाईम आयेगा' या गाण्याला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या व्हिडीओला शेअर करत त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.हेही वाचा

खुशखबर! चार लोकल्सना अतिरिक्त थांबे

माथेरानच्या मिनी ट्रेनला व्हिस्टाडोमची मोहिनीसंबंधित विषय
ताज्या बातम्या