Advertisement

घाटकोपरमध्ये ९ तासांत पडला २८० मि.मि. पाऊस, आणखी २४ तास बरसणार

सकाळी ८.३० च्या सुमारास दणक्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर संध्याकाळी ५ वाजेनंतर ओसरला. तोपर्यंत मुंबईकरांची चांगलीच वाताहात झाली होती.

घाटकोपरमध्ये ९ तासांत पडला २८० मि.मि. पाऊस, आणखी २४ तास बरसणार
SHARES

जूनमध्ये पडलेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची पळता भुई थोडी करून टाकली. कारण शुक्रवारी बरसलेल्या पावसाने मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकलं. सकाळी ८.३० च्या सुमारास दणक्यात सुरू झालेल्या पावसाचा जोर संध्याकाळी ५ वाजेनंतर ओसरला. तोपर्यंत मुंबईकरांची चांगलीच वाताहात झाली होती. मुंबईत घाटकोपरमध्ये सर्वाधिक २८० मिमि पावसाची नोंद करण्यात आली.

मुसळधार पावसाने ठिकठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. यामुळे एसव्ही रोड, लिंक रोडसोबतच  द्रुतगती मार्गावर जागोजागी वाहतूककोंडी झाली. पुढे जाण्यासाठी वाहनचालकांसमोर पाणी कापत जाण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.  तर रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेल्याने पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा खोळंबली होती. या मार्गांवरील प्रत्येक लोकल किमान १५ ते २० मिनिटे उशीराने धावत होती. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. मुंबईतील मुसळधार पावसाचा विमानसेवेलाही फटका बसला. मुंबई विमानतळावरील अनेक विमानांचं उड्डाण नियोजीत वेळेपेक्षा उशीराने झालं.  

 हेही वाचा-मुंबईत पुढच्या ४ तासांत पावसाचा जोर वाढणार, तिन्ही मार्गावरील लोकलसेवेचा खोळंबा

मुंबई शहर आणि उपनगरात पावसामुळे ९ ठिकाणी शॉर्ट सर्कीटच्या घटना घडल्या. त्यात ३ जणांचा मृत्यू झाला. पहाटे ७.४८ च्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील आरटीओ ऑफिससमोर काशीमा युडियार (६०) ही वृद्ध महिला विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडील वीरवानी इस्टेटजवळ शॉक लागून ४ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव (६०) आणि संजय यादव (२४) अशी मृतांची नावे आहेत. तर आशादेवी यादव ही ५ वर्षांची मुलगी आणि दीपू यादव (२४) या दोघांची प्रकृती स्थिर आहे. तसंच  ५ ठिकाणी झाडे कोसळली आणि दादरमधील फूल मार्केटमध्ये भिंत कोसळून त्यात ३ जण जखमी झालेत. 

 हेही वाचा- पावसाच्या ताज्या अपडेटसाठी इथं क्लिक करा

मुंबईसह कोकणात पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 

शुक्रवार सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत पडलेला पाऊस :  

ठिकाणपाऊस (मि.मि.)
घाटकोपर 
२८०.८०
पवई   
१६४.६०
बीकेसी   
१४७.४०
सांताक्रूझ  
१३९.९ 
अंधेरी
१३८.४०
लोखंडवाला
१३७
चेंबूर  
१३६.६०
मालाड पश्चिम   
१३२.८०
मुलुंड पूर्व   
१२७.४०
भांडुप पश्चिम   
१०८.६०
विद्याविहार   
९९.८०
कांदिवली पश्चिम ८०.८०
वांद्रे पश्चिम   
७८.६०
बोरीवली   
७०
दादर   
६१.४० 
मुलुंड पश्चिम   
५५.४०
वरळी   
४९.८०
माझगाव  
४९.६०
गोरेगाव  
४६.८०
एनएससी (वरळी)   
३९.६०
कुलाबा  
११.२०


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा