टू व्हिलरवरील चिमुरड्यांनाही आता हेल्मेटसक्ती

टू व्हिलरवर लहान मुलांना घेऊन जाणं आई-वडिलांना तापदायक ठरणार आहे. कारण या चिमुरड्यांनासुद्धा आता हेल्मेट घालावं लागणार आहे.

SHARE

टू व्हिलरवर लहान मुलांना घेऊन जाणं आई-वडिलांना तापदायक ठरणार आहे. कारण या चिमुरड्यांनासुद्धा आता हेल्मेट घालावं लागणार आहे. मोटर वाहन कायद्यातील नव्या सुधारणांनुसार आता ४ वर्षावरील वयाच्या मुलांनाही हेल्मेट सक्तीचं होणार आहे. हेल्मेट न घातल्यास गाडी चालवणाऱ्याला दंड केला जाणार आहे.

वडिलांच्या पुढे बाईकच्या पेट्रोल टाकीवर आणि स्कुटीवर आईच्या पुढ्यात चिमुरडी अॅडजस्ट होतात.  पण आता आई-वडिलांना स्वतःबरोबरच  मुलांसाठीही आठवणीने हेल्मेट बाळगावं लागणार आहे. चिमुरड्यांना आता डोक्यावर हेल्मेट घालण्यावाचून पर्याय नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन संशोधन विधेयक २०१९ मध्ये याची तरतूद केली आहे. याची अंमलबजावणी सुरु केली जाणार आहे. 

भारतात दरवर्षी अपघाता दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात. या अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असून लहान मुलांचाही यामध्ये बळी जात आहे. यामुळेच आता गाडीवर बसणाऱ्या लहान मुलांना देखील हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. गाडीवर बसलेल्या लहान मुलांनी जर हेल्मेट घातलं नसेल तर त्याचा दंड पालकांना भरावा लागणार आहे.हेही वाचा  -

'या' १२ मार्गांवर सुरू होणार वातानुकूलित मिनी बस सेवा

'पब्जी'ला मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये स्थान
संबंधित विषय
ताज्या बातम्या