Advertisement

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरू होणार?

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यासंदर्भात दिले हे संकेत...

जाणून घ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा कधी सुरू होणार?
SHARES

देशामध्ये मार्च महिन्यापासून बंद असणारी देशांतर्गत विमान वाहतूक सेवा २५ मेपासून सुरू झाली. कालांतरानं जून महिन्यापर्यंत प्रवासीसंख्या देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संकेत दिले आहेत. 

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Aviation Minister Hardeep Puri) यांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत एक महत्त्वाचे ट्वीट केलं आहे. त्यांनी यामध्ये असं म्हटलं आहे की, विमान प्रवासातील देशांतर्गत रहदारी ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करता येतील.

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळामध्ये भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. साधारण तीन महिन्यापासून ही सेवा बंद आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत (Vande Bharat Mission) अंतर्गत परदेशातून विमानं भारतामध्ये येत आहेत. मात्र यामध्ये केवळ परदेशामध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना देशात परत आणण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या स्पेशल चार्टड विमानांवर अमेरिकेने प्रतिबंध घातले आहे. अमेरिकेनं अनुचित आणि भेदभाव वृत्तीचा आरोप केला आहे. दोन्ही देशांमध्ये असलेल्या उड्डाण कराराचा हा भंग असल्याचं म्हटलं आहे. परिवहन विभागानं म्हटलं आहे की, एअर इंडिया लिमिटेड कोरोना संकटाच्या काळात आपल्या नागरिकांना मायदेशी नेत आहेत, सोबतच लोकांना तिकिटांची देखील विक्री करत आहे.



हेही वाचा

ठाण्यात बाईकवर डबलसीट बसाल तर दंड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा