• महिलेचा जीव वाचवणाऱ्या कॉन्स्टेबलचा गौरव
SHARE

कांजूरमार्ग स्थानकात लोकलमधून उतरत असताना साडी लोकलच्या दारात अडकून फरफटत गेलेल्या पूनम चेतन काळसानी या महिलेचा जीव राजकमल यादव या आरपीएफ कॉन्स्टेबलने वाचवला.  या धाडसाची दखल घेत बुधवारी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडून ५००० हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन राजकमल यादव यांचा सत्कार करण्यात आला.


काय होती घटना

कांजूरमार्ग येथील स्थानाकात पूनम चेतन काळसानी या लोकलमधून उतरत असताना त्यांची साडी लोकलच्या दारातच अडकली आणि तेवढ्यात लोकल सुरु झाली. त्यामुळे पूनम साडीबरोबर ओढल्या जाऊन गाडीसोबत फरफटत गेल्या. मात्र त्याच वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबल राजकमल यादव यांनी त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचाही तोल जाऊन ते खाली पडले. सुदैवाने तेथे उपस्थित इतर प्रवाशांनी पूनम यांना ओढून घेतले. त्यांचा थोडक्यात जीव वाचला. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनीसुद्धा ट्विट करून यादव यांचं अभिनंदन केलं आहे.हेही वाचा -

एक्सप्रेस उशीरा धावत असेल तर कळणार व्हॉट्सअॅपवर

मुंबई-पुणे ब्ल्यू अँड सिल्व्हर टॅक्सी होणार बंद?
संबंधित विषय
ताज्या बातम्या