Advertisement

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची प्रतिक्षा कायम

मुंबईची लोकल सेवाही सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का? या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र अद्याप कोरोना नियंत्रणात आला असला तरी लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची प्रतिक्षा कायम
SHARES

मुंबईसह राज्यभरात (maharashtra) कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव आता हळुहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळं १ जूनपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी मुंबईची लोकल सेवाही सर्वसामान्यांसाठी सुरू होणार का? या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र अद्याप कोरोना नियंत्रणात आला असला तरी लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परंतू, राज्य सरकारनं सूचना केल्यानंतर तातडीनं सर्वसामान्यांना लोकलमुभा देण्यात येईल. पूर्ण क्षमतेनं लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या होकाराची प्रतीक्षा करत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोनाच्या (covid19) पार्श्वभूमीवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, सध्यस्थितीत पश्चिम रेल्वेवर (Western railway) सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. मध्य रेल्वेवर (Central railway) ८० टक्के लोकल फेऱ्या धावत आहेत. कोरोनामुळं राज्य सरकारनं घातलेल्या निर्बंधांमुळं लोकल पूर्ण प्रवासी क्षमतेनं आद्याप चालवल्या जात नाही आहेत.

गतवर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आलेली लोकल जून महिन्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं लोकल सेवा सुरू करण्यात आली. परंतू, सर्वसामान्यांसाठी थेट नववर्षांत म्हणजेच १ फेब्रुवारी पासून लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र अवघ्या काही दिवसातच पून्हा बंद करण्यात आली.

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या घटत आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी राज्यात २४ हजार १३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मंगळवारी ६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१ टक्के  आहे. तसंच राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख १८ हजार ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईत (mumbai) १०३७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ४२७ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ५५ हजार ४२५  झाली आहे. मंगळवारी मुंबईत ३७  रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील मृतांची एकूण संख्या १४ हजार ७०८ इतकी झाली आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३५ लाख ४१ हजार ५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २६ हजार १५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ लाख १६ हजार ४२८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २० हजार ८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.हेही वाचा -

हार्डवेअर, छत्र्या-रेनकोटची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय

MPSC पोलीस उपनिरीक्षक भरतीतील शारीरिक परीक्षेच्या निकषांमध्ये बदल


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा