Advertisement

महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक महामंडळाला भाडेवाढ करण्याचा सल्ला

कर्नाटक एसटी महामंडळाच्या एसटीच्या तिकीटचं भाडं वाढण्याची शक्यता आहे

महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कर्नाटक महामंडळाला भाडेवाढ करण्याचा सल्ला
SHARES

मुंबई ते बंगळुरू, मुंबई ते स्वारगेट आणि बोरीवली ते पुणे या मार्गावर महाराष्ट्र एसटी महामंडळ आणि कर्नाटक एसटी महामंडळाच्या बस चालविण्यात येतात. परंतु, येत्या काळात या मार्गावर धावणाऱ्या कर्नाटक एसटी महामंडळाच्या एसटीच्या तिकीटचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. कारण, कर्नाटक एसटी महामंडळाच्या एसटीचं तिकीट भाडं कमी असल्यानं ते महाराष्ट्र एसटी मंडळानं वाढविण्यास सांगितल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळानं कर्नाटक एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करून, महाराष्ट्र एसटी महामंडळासारखे जादा भाडे आकरण्यास सांगितल्याचं समजतं.


भाडं कमी

मुंबई ते स्वारगेट महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या शिवनेरीचं भाडे ४४९ रुपये, तर कर्नाटक एसटी महामंडळाच्या ऐरावतचे भाडं ३६१ रुपये आहे. मुंबई ते बंगळुरू शिवशाहीचं १ हजार ८७४ रुपये, तर ऐरावतचं १ हजार २६० रुपये आहे. बोरीवली ते पुणे शिवनेरीचं भाडे ५१४ रुपये, तर ऐरावतचे भाडे ३६४ रुपये आहे. त्यामुळं हे भाडे वाढवण्यात यावं असं पत्रातून महाराष्ट्र एसटी महामंडळानं कर्नाटक एसटी महामंडळाला म्हटलं आहे.


महसुलावर परिणाम

या मार्गावरून धावणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक महामंडळांच्या गाड्या आरामदायी आणि अत्याधुनिक पद्धतीच्या आहेत. मात्र, कर्नाटक महामंडळाच्या ऐरावतचं भाडे कमी असल्यानं प्रवाशांचा कल ऐरावतकडं असतो. त्यामुळं याचा महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या महसुलावर परिणाम होत असल्यानं कर्नाटक महामंडळाला भाडेवाढ करण्यास पत्रव्यवहारातून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: अनंत चतुर्दशीला हलक्या पावसाची शक्यता

मुंबई-नाशिक प्रवास लवकरच होणार जलद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा