Advertisement

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 'या' तारखेपासून सुरू

नाताळ आणि नवीन वर्षानिमित्तानं परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 'या' तारखेपासून सुरू
SHARES

नाताळ आणि नवीन वर्षानिमित्तानं परदेशवारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. भारत सरकारनं १४ देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाची साथ ओसरत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

१५ डिसेंबरपासून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, फिनलँड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे आणि न्यूझीलँड सह १४ देशांना वगळता इतर देशांसाठी नियमितपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या १४ देशांमध्ये अनेक देशांमध्ये एअर बबल करारातंर्गत विमान सेवा सुरू आहे.

भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोविड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.

ज्या १४ देशांमध्ये नियमितपणे विमानसेवा सुरू करण्यात आली नाही. त्या देशांमध्ये बबल करारानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. व्यवसाय ठप्प असल्यानं विमान कंपन्या अडचणी सापडल्या होत्या.

डिसेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे प्रमाण वाढणार आहे. देशात ४० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत

आंतरराष्ट्रीय विमान सेवेप्रमाणे देशांतर्गत विमानसेवाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, दोन महिन्यानंतर देशांतर्गत विमान सेवा काही नियम आणि निर्बंधासह पुन्हा सुरू करण्यात आली. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण क्षमतेसह विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.



हेही वाचा

मुंबईहून आग्रासाठी 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू

मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान, वॉटर टॅक्सी 'या' महिन्यात सुरू

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा