Advertisement

रेल्वेकडून ३० जूनपर्यंतची तिकिटं रद्द, श्रमीक विशेष ट्रेन सुरुच राहणार

रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस, लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे.

रेल्वेकडून ३० जूनपर्यंतची तिकिटं रद्द, श्रमीक विशेष ट्रेन सुरुच राहणार
SHARES

३० जूनपर्यंत रेल्वे तिकिटांचं बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकिटं रद्द करण्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. या तिकिटांचे पूर्ण पैसे प्रवाशांना परत मिळणार मिळणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमध्ये मेल, एक्सप्रेस, लोकल उपनगरीय रेल्वे तिकिटांचा समावेश आहे. दरम्यान, स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या श्रमीक विशेष ट्रेन मात्र सुरुच राहणार आहेत.

लॉकडाउन सुरु झाल्यानंतर रेल्वेने ९४ लाख तिकीटं रद्द केली आहे. या रद्द केलेल्या तिकिटांचे एक हजार ४९० कोटी रुपये प्रवाशांना रेल्वेने परत केले आहेत. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये म्हणजेच २२ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान रेल्वेने रद्द केलेल्या तिकीटांचे ८३० कोटी रुपये परत केले होते. अत्यावश्यक माल वाहतूक वगळता सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वेची सेवा २२ मार्चपासून स्थगित करण्यात आलेली आहे. 

मंगळवारी रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी विशेष १५ ट्रेनसाठी तिकिटं खरेदी केलं आहे. मंगळवारी दिल्लीमधून तीन ट्रेन परराज्यांमध्ये पाठवण्यात आल्या तर पाच राज्यांमधून दिल्लीच्या दिशेने ट्रेन रवाना झाल्या आहेत. मंगळवारी सोडण्यात आलेल्या ट्रेनमधून आठ हजार प्रवासी प्रवास करत होते. पुढील सात दिवसांसाठीच्या ट्रेन्ससाठी ९० हजारहून अधिक प्रवाशांनी तिकिटांचे बुकींग केले आहे. सोमवारपासून रेल्वेने विशेष ट्रेन सुरु केल्या असून यासंदर्भातील नवीन नियम रेल्वेने जारी केले आहेत.

नवीन नियमांनुसार प्रवाशांने स्वत:चे जेवण, अंथरुण-पांघरुण आणण्यास सांगण्यात आलं आहे.  तसेच रेल्वने प्रवास करण्याआधी प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याने गाडी सुटण्याच्या ९० मिनिटं आधीच स्थानकात पोहचण्याच्या सूचना प्रवाशांना करण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊ नलोड करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

मुंबई : COVID 19 च्या तपासणीसाठी पहली मोबाइल टेस्टिंग बस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा