Advertisement

भारतातील पहिलं मोबाईल CNG रिफिलिंग युनिट लाँच

आता सीएनजी (CNG) सुद्धा फिरत्या वाहनातून पुरविण्याची सुविधा देशात सुरु झाली आहे.

भारतातील पहिलं मोबाईल CNG रिफिलिंग युनिट लाँच
SHARES

आता सीएनजी (CNG) सुद्धा फिरत्या वाहनातून पुरविण्याची सुविधा देशात सुरु झाली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रसाद यांनी मंगळवारी सीएनजी फिरत्या इंधन आपूर्ती सुविधेचे उद्घाटन करताना ही माहिती दिली. अशी सुविधा देणारे पहिले केंद्र इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीनं दक्षिण दिल्लीत सुरू केलं आहे. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात ही कंपनी सेवा देणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात इंधन आपुर्ती सुविधा युनिट महानगर गॅस लिमिटेडनं रायगडमध्ये तैनात केले आहे. या वाहनात १५०० किलो सीएनजी ठेवता येतो आणि दररोज साधारण १५० ते २०० वाहनांना उपलब्ध करून दिला जातो. जेथे सीएनजी स्टेशन जवळ नाही तेथे ही वाहने उपयुक्त ठरतात.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सुरुवातीला सीएनजी आणि पाईप गॅस फक्त महानगरात उपलब्ध होता. पण आता निमशहरी भागात आणि छोट्या शहरात ही सुविधा दिली जात आहे. २०३० पर्यंत नैसर्गिक वायू उर्जेचा खप ६.२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेला जाणार आहे.

याशिवाय हायड्रोजन, बायोगॅस, इथेनॉल मिश्रित पेट्रोल, एलएनजी अशा स्वच्छ इंधन वापरावर जोर देण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. इंडीयन ऑइल बडोदा इथं लवकरच हायड्रोजन स्टेशन सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 


हेही वाचा

इंधन दरवाढ सुरूच, मुंबईत पेट्रोल १०१ रुपयांच्या वर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा