Advertisement

इंधन दरवाढ सुरूच, मुंबईत पेट्रोल १०१ रुपयांच्या वर

या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशातील जवळपास १३५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्यावर पोहोचले आहेत.

इंधन दरवाढ सुरूच, मुंबईत पेट्रोल १०१ रुपयांच्या वर
SHARES

पेट्रोल (petrol) आणि डिझेल (diesel) च्या वाढत्या किंमतींमुळे (price hiked) सर्वसामान्य हैरान झाला आहे. या दरवाढीने आतापर्यंतचे विक्रम मोडले आहेत. सोमवारी पुन्हा पेट्रोल, डिझेल महाग झालं आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे २६ ते ३१ पैशांनी तर डिझेलचे दर २६ ते २८ पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत आता पेट्रोलचा भाव १०१ रुपयांच्या वर गेला आहे. 

या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ झाली आहे. देशातील जवळपास १३५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपयांच्यावर पोहोचले आहेत. मुंबईत (mumbai) पेट्रोल (petrol) चा दर आता १०१.५२ रुपये झाला आहे. तर डिझेल (diesel) ९३.५८ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत (chennai) पेट्रोल ९६.७१ रुपयांवर तर डिझेल ९०.९२ रुपयांवर गेले आहे. दिल्लीत (delhi) पेट्रोलचा भाव ९५.३१ रुपये आणि डिझेलचा भाव ८६.२२ रुपये झाला आहे. तर कोलकातामध्ये ( kolkata) पेट्रोलचा दर ९५.२८ रुपये आणि डिझेलचा दर ८९.०७ रुपयांवर पोहोचला आहे. 

जून महिन्यात आतापर्यंत पेट्रोल १ रुपया ८ पैसे आणि डिझेल १ रुपया ७ पैसे महाग झाले आहे. मार्च महिन्यात १६ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. तर मे महिन्यात सलग ४ दिवस इंधनाची दरवाढ झाली होती. जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत. 

महाराष्ट्रात अमरावती, औरंगाबादमध्ये , भंडारा, बुलढाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, नंदुरबार, उस्मानाबाद, रत्नागिरी, सातारा, सोलापर, वर्धा, वाशीम, ठाणे, मुंबई या शहरांमध्ये आता पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. 

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.



हेही वाचा - 

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

नेटफ्लिक्स मुंबईत उभारणार जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा