Advertisement

पेट्रोलच्या वाढत्या भावामुळं मुंबईत सीएनजीची मागणी वाढली

मुंबईत पेट्रोलचे दरानं आता शंभरी पार केल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळं वाहनचालकांचा खर्च वाढला आहे.

पेट्रोलच्या वाढत्या भावामुळं मुंबईत सीएनजीची मागणी वाढली
SHARES

मुंबईत पेट्रोलचे दरानं आता शंभरी पार केल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळं वाहनचालकांचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी आता सीएनजीला जवळ केलं आहे. परिणामी सीएनजीच्या मागणीत वाढ होत असल्याचं चित्र आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १००.४७ रुपये झाला आहे. त्यामुळं वाहनचालकांचा रोजचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सध्या सर्वसामान्यांना लोकलमुभा नाही. मात्र अनेक कार्यालयं कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनाचा आधार घेतला आहे. स्वत:चे वाहन चालवत कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचावे लागत आहे. त्यामुळे महिन्याच्या खर्चात वाढ झाली आहे. लोकलमुभा नसल्यानं अनेक कर्मचाऱ्यांन रोजचा १०० किमीचा प्रवास स्वत:च्या गाडीने करावा लागत आहे.

चारचाकी गाडी एका लिटर पेट्रोलमध्ये साधारण १८ ते २० किमी धावते. तर दुचाकी एका लिटरमध्ये ५० किमी धावते. दुचाकी वाहनचालकांचा रोजचा खर्च १५ ते २० रुपयांनीच वाढला आहे. पण चारचाकी चालकांचा खर्च खूप वाढला. त्यामुळेच आता सीएनजीआधारित वाहनांची मागणी वाढली आहे.

मुंबईत महानगर गॅस लिमिटेडकडून (एमजीएल) वाहनांना सीएनजी पुरविला जातो. एमजीएलनुसार १८ ते २० किमीचा माईलेज असणारी पेट्रोल गाडी रोज १०० किमी धावत असल्यास सीएनजी वापरल्यास त्या गाडीचा खर्च २७५ येतो. डिझेल गाडीच्या रोजचा खर्चापेक्षा तो १७५ रुपयांनी कमी असतो.



हेही वाचा -

इंधन दरवाढ सुरूच, अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या वर

मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा