Lok Sabha Election Mumbai 2019 Results

इंडिगो एअरलाइन्स मुंबईतून सुरू करणार आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय विमान सेवा

भारतातील नागरिकांना कमी दरात विमान सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सनं मुंबईतून नवीन आंतरदेशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

SHARE

भारतातील नागरिकांना कमी दरात विमान सेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सनं मुंबईतून नवीन आंतरदेशी आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मुंबई ते जेद्दाह, दम्मम आणि अबू धाबीसाठी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसंच, आंतरदेशीय विमान सवांमध्ये मुंबई ते इंदौर, कोची आणि पाटण्यासाठी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.


२० अतिरिक्त विमान सेवा

इंडिगो कंपनी १५ एप्रिलपासून मुंबई आणि दिल्ली येथून प्रत्येकी अंदाजे २० विमान सेवा सुरू करणार आहे. उन्हाळ्यात विमान प्रवासादरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ही उड्डाणं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मुंबई ते जेद्दाहसाठी ५ जूनपासून आणि दम्ममसाठी ५ जुलैपासून उड्डाणं सुरू करण्यात येणार आहेत.

याबाबत, इंडिगोचे चीफ कमर्शियल ऑफिसर विलियम बोल्टर यांनी सांगितलं की, जेद्दाह कमर्शियल राजधानी असून, हजला जाण्याचा मार्ग आहे. तसंच, दम्मम, सौदी अरेबीयामध्ये विकास केंद्र असून अबू धाबी युनायटे अरब अमिरातीची राजधानी आहे. त्याचप्रमाणं, संस्कृतिक आणि कमर्शियल केंद्रदेखील आहे.हेही वाचा -

मोबाईल तिकीटवर प्रवाशांना मिळणार ५ टक्के बोनससंबंधित विषय