Advertisement

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस जून, 2024पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस जून, 2024पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार
SHARES

बहुचर्चित जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसच्या कामाला अखेर मुहूर्त मिळला आहे. पश्चिम रेल्वेवरील चौथ्या आणि मुंबईतील सहाव्या रेल्वे टर्मिनसच्या उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने कंत्राटदार नियुक्त केला आहे.

‘जोगेश्वरी टर्मिनस उभारणीमध्ये १३ कंत्राटदारांचा सहभाग आहे. तांत्रिक-आर्थिक छाननीअंती गिरीराज सिव्हिल कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.

टर्मिनस बांधकाम आणि विद्युतीकरण अशा दोन टप्प्यांत टर्मिनसची उभारणी होणार आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. जून, २०२४पर्यंत टर्मिनस रेल्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. टर्मिनस उभारण्यासाठी ७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

राम मंदिरालगतच टर्मिनस असल्याने उपनगरी प्रवाशांसाठी अधिक सोईस्कर झाले आहे.

पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे ५०० मीटर आहे. राम मंदिरच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे. यामुळे लोकलने येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीशिवाय टर्मिनसमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.

२४ डब्यांच्या रेल्वे गाड्या चालवण्यासाठी सक्षम ठरू शकतील, असे फलाट नव्या टर्मिनसमध्ये उभारण्यात येतील. एक मार्गिका रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी आणि दोन मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी असतील.

तळमजला अधिक दोन अशी इमारत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयासाठी असणार आहे. होम फलाटावर स्थानक इमारत असणार आहे.

टर्मिनस परिसरात सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी वाहनांसाठी विशेष व्यवस्था आहे. पादचारी प्रवाशांसाठी राखीव क्षेत्र आहे. तसेच खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे.


हेही वाचा

पश्चिम रेल्वेवरील 'या' 7 स्थानकांवरील गर्दी होणार कमी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा