Advertisement

'या' वेळेत लालबाग उड्डाणपूल ३ महिन्यांसाठी बंद

दक्षिण मुंबईतील लालबाग उड्डाणपूल काही महिने बंद असणार आहे.

SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईतील (mumbai) लालबाग उड्डाणपूल काही महिने बंद असणार आहे. काही विशिष्ट वेळेसाठी बंद असणार आहे. मुंबई महापालिकेनं लालबाग उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचं आणि बेअरिंगचं काम हाती घेतलं आहे. यामुळे लालबाग उड्डाणपूल पुढील ३ महिन्यांसाठी बंद असणार आहे.

बुधवारपासून हा उड्डाणपूल बंद असणार आहे. महापालिकेनं (bmc) लालबाग उड्डाणपूलावरील दुरुस्ती आणि बेअरिंगचं काम सुरू केलं असून बुधवारपासून पुढील ३ महिने रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत हा उड्डाणपूलावर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जर या उड्डाणपूलावरुन वाहतुक केली तर त्याचा कामावर परिणाम होईल.

त्यामुळं दक्षिण मुंबईहून येणारी वाहतुक परळ पूल किंवा परळ टीटी जंक्शनमार्गे जाऊ शकतात किंवा पुलाच्या खालून १५ जूनपर्यंत वाहने चालवू शकतात, असं पालिकेनं म्हटलं आहे. राणी बागेच्या जवळील भायखळा बाजार ते उत्तर दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पुढील ३ महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल. या कालावधीत सुलभ वाहनांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक पोलिस तैनात केले जाणार आहेत.



हेही वाचा - 

राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण

यंदा होळी सण साजरा करण्यास मनाई


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा