Advertisement

दूधसागर रेल्वे मार्गावर दरड कोसळली, 'या' एक्स्प्रेस रद्द

रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय.

दूधसागर रेल्वे मार्गावर दरड कोसळली, 'या' एक्स्प्रेस रद्द
SHARES

दूधसागर रेल्वे मार्गावरही दरड कोसळली आहे. रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती वाहून आल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. दरड कोसळून अडथळा निर्माण झाल्यामुळे दक्षिण-पश्चिम रेल्वे प्राधिकरणानं या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

तर वास्को रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मडगाव रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वे मार्गानं वळवण्यात आला आहे. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

दोन्ही बाजूच्या डोंगरावरुन रेल्वे रुळावर दरड कोसळली आहे. त्यामुळे रेल्वे रुळासोबतच रेल्वेच्या डब्यातही चिखल आणि पाणी आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

रेल्वेचा एक डबा रुळावरून घसरल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सुरळीत करण्यास काहीसा वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी या मार्गावरील रेल्वे गाड्या अन्य मार्गांवरून वळवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, दूधसागर रेल्वे मार्गावर आज सकाळी २ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर वास्को-हावडा, वास्को-तिरुपती आणि वास्को-तिरुपती-हैदराबाद एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे कसारा घाटात बुधवारी रात्री दरड कोसळली. यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला.

सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हजूर साहेब नांदेड स्पेशल या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही ट्रेन अर्ध्यावर थांबवण्यात आल्या आहेत. तर ट्रेनचे मार्ग वळवण्यात आले आहेत.



हेही वाचा

रायगड दरड दुर्घटनेतील मृतांना केंद्राकडून २ लाखांची मदत

हा’ तर अतिवृष्टीच्या पलिकडचा पाऊस- उद्धव ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा