Advertisement

मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाल्यानं सामान्यांसाठी कधी सुरू होणार? हा प्रश्न सर्व स्तरावरून विचारला जात आहे.

मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नाही- मुख्यमंत्री
SHARES

लॉकडाऊनमुळं (mumbai lockdown) बंद असलेली मुंबई आता हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येत आहे. मुंबईतील (mumbai) कंपन्या, दुकानं, वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली असून, मुंबईची लाइफलाइन लोकलही (mumbai local) सुरू झाली आहे. परंतू, मुंबई लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाल्यानं सामान्यांसाठी कधी सुरू होणार? हा प्रश्न सर्व स्तरावरून विचारला जात आहे. याबाबत उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी रविवारी फेसबुक (facebook) लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी माहिती दिली आहे. 'राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

'कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,' असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

जिम सुरू करण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. जिमसाठी नियमावली आवश्यक आहे त्याविषयी बोलण सुरु आहे. असं सांगतानाच जीम इतक्यात सुरू होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा