Advertisement

मुंबईकरांसाठी आणखी एक सी लिंक, मार्चमध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाचा शुभारंभ


मुंबईकरांसाठी आणखी एक सी लिंक, मार्चमध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाचा शुभारंभ
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंकचा वरळी ते नरीमन पाॅईंट असा पुढचा टप्पा रखडलेला असताना वांद्रे-वर्सोवा विस्तार लवकरच मार्गी लागणार आहे. कारण वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्यासंबंधीचा अध्यादेश सोमवारी सरकारकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामडंळ (एमएसआरडीसी) कामाला लागले आहे.

त्यानुसार जानेवारी २०१८ पर्यंत सी लिंकच्या बांधकामाच्या निविदा अंतिम करत मार्च २०१८ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती 'एमएसआरडीसी'चे सहव्यवस्थापकिय संचालक किरण कुरुंदकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


निर्णय कधी?

सन २००९ मध्ये वांद्रे-वर्सोवा सी लिंक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करत २०१३ मध्ये या प्रकल्पाला केंद्र सरकाकडून पर्यावरणासंबंधीची तसेच सीआरझेडसंबंधीची परवानगी देण्यात आली. पण हा प्रकल्प अजूनपर्यंत रखडलेलाच होता. आता मात्र या प्रकल्पाला वेग मिळणार आहे.कंपन्यांची निवड आधीच

या प्रकल्पाच्या बांधकामासाठी इच्छुक ५ कंपन्यांची निवड याआधीच 'एमएसआरडीसी'ने केली आहे. आता या कंपन्यांना १५ जानेवारीपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. त्यानंतर या कंपन्यांमधून जे कोणी निविदा प्रक्रियेत बाजी मारेल त्या कंपनीला कंत्राट दिलं जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडण्यास फेब्रुवारी २०१८ उजाडणार आहे. त्यामुळे सी लिंकचं प्रत्यक्ष बांधकाम मार्च २०१८ पासून सुरू होईल, असं कुरूंदकर यांनी स्पष्ट केलं आहे.


वांद्रे ते वर्सोवा केवळ १२ मिनिटांत

एकूण ९.६० किमी अंतराचा हा सी लिंक असून यासाठी ७५०२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर या प्रकल्पाला ४ कनेक्टर अर्थात जोडरस्ते असणार आहेत. वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोळीवाडा आणि नाना-नानी पार्क अशा ठिकाणी हे कनेक्टर असणार आहेत. ४ कनेक्टर, ३ पथकर स्थानक आणि केबल स्टेड पूल मिळून हा संपूर्ण प्रकल्प १७.१७ किमी लांबीचा होणार आहे.हेही वाचा-

सी लिंक वाहतुकीस खुला; अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलिसांचं आवाहन

मुंबईकरांनो, पुढील ३५ वर्षे टोलमुक्ती नाहीच! वांद्रे-वरळी सी लिंकवर २०५२ पर्यंत टोलवसुली


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा