Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 'बोनस'बाबत उद्या होणार निर्णय


बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 'बोनस'बाबत उद्या होणार निर्णय
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कामगारांनाही १५ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी बेस्टचे कर्मचारी करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या मागणीबाबत गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या बैठकीत बोनसबाबत कोणताही निर्णय न झाल्याने शुक्रवारी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांचे लक्ष आता या बैठकीकडे लागून राहिलं आहे.


गेल्यावर्षी सानुग्रह अनुदान

२०१६-१७ या वर्षी महापालिकेतर्फे सानुग्रह अनुदानासाठी अागाऊ रक्कम स्वरुपात बेस्टला देण्यात आली होती. बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५५०० रुपयांचं सानुग्रह अनुदान दिलं होतं. परंतु, उपक्रमाच्या आर्थिक परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा न झाल्यामुळे ही रक्कम ११ सामान हप्त्यामध्ये कापून घेण्यात आली होती.


बैठकीकडे लक्ष

यंदा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जितका बोनस मिळाला आहे, तितकाच बोनस बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा-

दिवाळीच्या आधीचं बेस्टचं दिवाळं, बेस्टचा कारभार ठप्प होता होता बचावला

बोनससाठी गुरूवारपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा